दौंड, 5 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत खडी क्रेशर माफीयांनी मोठे थैमान घातले आहे. वासुंदे येथील सद्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या मागचं कारण म्हणजे, वासुंदे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे.
मुर्टीत माजी विद्यार्थ्यांनी 32 वर्षांनी भरवला दहावीचा वर्ग
वासुंदे गाव परिसरात झालेल्या उत्खननाने सजीव सृष्टीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक प्रकारे तक्रारी देऊन सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडिक यांनी सर्व विषयांचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा 2006 अन्वये पाटसचे मंडल अधिकारी सुनिल गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस तहसिलदार दौंड यांनी दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत युतीच्या उमेदवारीचे अर्ज दाखल
सदर नोटिस नुसार 48 तासात समक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करण्याबाबत आदेश केले आहेत. सदर म्हणणे सादर न केल्यास कारवाई करणार असल्याचे आदेश तहसिलदारांनी दिले आहेत.
‘जो पर्यंत तेथील खडी क्रेशर बंद होणार नाही, तो पर्यंत सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेचा लढा सुरू राहणार आहे.’ असे भालचंद्र महाडिक यांनी ‘भारतीय नायक’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
2 Comments on “दप्तर दिरंगाई कायदा अन्वये मंडल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस”