कोल्हापुरात थरकाप उडवणारा अपघात; तिघांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

कोल्हापूर, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) कोल्हापूर मध्ये आज थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. कोल्हापुरातील सायबर चौकात भरधाव वेगात असलेल्या कारने अनेक दुचाकी गाड्यांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या अपघातानंतर येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://x.com/dbmahadik/status/1797590052631089300

तीन ठार, पाच जखमी

कोल्हापूर मधील सायबर चौकात आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. आज दुपारी सायबर चौकातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. त्यावेळी अचानकपणे भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्यावरील काही दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेने काही लोक अक्षरशः रस्त्यावर लांब हवेत उडून पडले. तसेच या कारच्या वेगामुळे तीन ते चार दुचाकी वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातानंतर लोक रस्त्यावर जमले. यावेळी त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कार चालकाचा मृत्यू

दरम्यान, हा अपघात इतका भयंकर होता की, याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या अपघातात सबंधित कार चालकासह दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, वसंत चव्हाण असे या 72 वर्षीय मृत कार चालकाचे नाव आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर या अपघातातील 5 जखमींवर सध्या कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या अपघाताचा तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *