धाराशिव, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुल याठिकाणी 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. या सामन्यात नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीरचा 6-0 ने पराभव केला. त्यामुळे शिवराज राक्षे हा 65 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याचबरोबर शिवराज राक्षे याने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. यासोबतच त्याला महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षीस म्हणून देण्यात आली. तर उपविजेत्या हर्षवर्धन सदगीर याला बक्षीस म्हणून मानाची चांदीची गदा आणि ट्रॅक्टर देण्यात आला.
हे करा, अन्यथा तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद!
तत्पूर्वी, शिवराज राक्षे याने या वर्षाच्या सुरूवातीला पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाड याचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. या स्पर्धेचे आयोजन पुण्यातील कोथरूड येथे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी याठिकाणी करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. यावेळी अंतिम सामन्यात सिकंदर शेखने शिवराज राक्षेचा पराभव केला होता.
बावनकुळेंच्या कॅसिनोतील फोटोमुळे आरोप प्रत्यारोप
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये पार पडला. या स्पर्धेत राज्यभरातून 950 कुस्तीपटू आणि 550 पंच सहभागी झाले होते. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फूट पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दोन वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या जातात. दरम्यान धाराशिव शहरात प्रथमच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली आहे.
One Comment on “शिवराज राक्षे ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी”