बारामती, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रवीण गायकवाड यांचे ‘अहत ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा अवघा मुलुख आपला’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर व्याख्यान दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी बारामती शहरातील विद्यानगरी येथील गदिमा सभागृहात होणार आहे. या व्याख्यानानंतर ‘पाटी’ या पुरस्कारप्राप्त एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. तरी या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भगवान चौधर यांनी केले आहे.