बारामतीच्या आमराईत बसवण्यात येणारे ट्रान्सफॉर्मर इतरत्र हलवा; अन्यथा तीव्र आंदोलन करू- रविंद्र सोनवणे

बारामती, 18 जूनः बारामती शहरातील वसंतराव पवार नाट्यगृह आणि कॉम्प्लेक्स विकसित करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र त्या ठिकाणी असणारे ट्रान्सफॉर्मर हे नव्याने बारामतीच्या आमराई विभागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेजारील तसेच प्रबुद्धनगर आणि वडकेनगर येथे बसविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी आमराई विभागातील झगडे गॅरेज जवळील, चिमणी फाटा शेजारील ट्रान्सफॉर्मरला आदित्य चौगुले या 8 वर्षाच्या मुलाला शॉक लागून तो 70 टक्के भाजला आहे. त्याच्यावर सध्या पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आश्वासनानंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित

प्रबुद्धनगर आणि वडकेनगर ही आमराईतील झोपडपट्टीचे ठिकाण आहे. सदरील परिसर हा दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या ट्रान्सफार्मरमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे सदरील ट्रान्सफॉर्मर हा अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशा स्वरूपाचे लेखी निवेदन 15 जून 2023 रोजी आरपीआय पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे यांच्या मार्फत बारामती नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण आदी विभागांना देण्यात आले.

सदर मागण्याची दखल न घेता ट्रान्सफॉर्मर इतरत्र हलवले गेले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी दिला आहे.

विनयभंगाचे आरोपातुन संतोष जाधव यांची निर्दोष मुक्तता – अ‍ॅड. जावळे

यावेळी आरपीआयचे बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, बारामती शहर युवक अध्यक्ष मयूर मोरे यासह मोईन बागवान, मोहम्मद शेख आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

One Comment on “बारामतीच्या आमराईत बसवण्यात येणारे ट्रान्सफॉर्मर इतरत्र हलवा; अन्यथा तीव्र आंदोलन करू- रविंद्र सोनवणे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *