बारामती, 4 नोव्हेंबरः बारामतीमधील शारदा नगर येथे माऊली चव्हाण नामक व्यक्ती केमिकल युक्त नशिली पदार्थाचा व्यापार करीत असल्याचे बोलले जात आहे. बारामती तालुक्यातील हे होलसेल डीलरचे नाव असून लोणी काळभोर येथून जेजुरी मार्गावरून तब्बल 40 लिटरचे एकूण 80 कँड चार चाकी गाडीमध्ये आणले जात आहेत. येथून बारामती शहरासह तालुक्यात वितरीत केले जात असल्याचे स्थानिक प्रतिनिधी सांगत आहेत.
मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी, आरोग्यास हानिकारक रसायन बारामतीमध्ये येऊन बारामती तालुका व शहरांमध्ये सर्रासपणे वितरण होत आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर बारामती शहराचा वरिष्ठ पोलीस अधिकारी या बेकायदा व्यवसायाचे प्रमुख लाभार्थी असल्याचे दबक्या आवाजात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
प्रेमविवाह केल्यानंतर नवविवाहित जोडप्याची हत्या
त्यामुळे मानवी शरीराला हानिकारक असलेली रसायन केमिकलवर कारवाई केली जात नसून पोलीस व दारूबंदी विभाग (एक्साईज विभाग) मधील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर जनसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, माळेगाव येथे रसायनिकयुक्त विषारी ताडी पिऊन एकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पोलीस प्रशासन अजून किती जणांचा खून करणार आहे?
One Comment on “शारदानगर माऊलीचा होलसेल केमिकल नशा?”