मुंबई, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी आज (दि.28) प्रत्युत्तर दिले आहे.
‘मी पुन्हा येईन’ च्या व्हिडिओवर फडणवीसांचे स्पष्टीकरण
मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, असे विधान त्यांनी माझ्या विरोधात केले होते. पण पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांनी या पदाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन असे विधान करावे. त्यांनी दिलेली माहिती वास्तवापासून लांब आहे. मी त्यांच्या पदाचा आदर करूनच त्यांना हे उत्तर देत आहे. मी 2004 ते 2014 या काळात देशाचा कृषिमंत्री होतो. मी जेव्हा कृषी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशात धान्याचा तुटवडा होता. देशात धान्याचा तुटवडा भासू नये, यासाठी आम्ही काही कठोर निर्णय घेतले. त्यावेळी अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला. तेंव्हा 2 दिवस मी त्या फाईलवर सही केली नव्हती. गहू, तूर डाळ, हरभरा डाळ, सोयाबीन, कापूस, ऊस, मका यांना यांच्या हमीभावात वाढ करण्यात आली. तेंव्हा देशात अन्नधान्याचे बंपर उत्पादन झाले. सोबतच मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देशातील शेतकऱ्यांचे 62 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. 2012 – 13 साली दुष्काळ पडला होता तेंव्हा चारा छावण्या काढण्याचे काम केले होते. तसेच त्यावेळी पीक कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली होती. असे शरद पवार यावेळी म्हणाले. सोबतच शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री असताना केलेल्या कार्याची सविस्तरपणे माहिती दिली.
मुकेश अंबानी यांना जीवे मरण्याची धमकी
याशिवाय शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. येत्या लोकसभा निवडणुकीत बदल होईल की नाही, याविषयी सांगता येत नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत बदल दिसत आहे. तसेच इंडियाच्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी आमच्यात एकमत नाही, मतभिन्नता असते, मात्र लोकसभेसाठी आम्हाला एकत्र यायचे आहे. याशिवाय शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या व्हिडिओवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही त्यांचा व्हिडिओ गांभीर्याने घेत नाही. शिंदे आणि अजित पवार यांच्याशिवाय फडणवीस 110 आमदारांसह एकटे सरकार चालवू शकणार नाहीत. असे ते म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आम्ही सरकारला सातत्याने आवाहन करत आहोत. त्यांचा संताप समजून घेऊन यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
One Comment on “शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर!”