अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण

पुणे, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांच्या सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला होता. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करण्याचे आदेश दिले होते, असा दावा अजित पवारांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता अजित पवारांना प्रत्यूत्तर दिले आहे. यासंदर्भात त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी केलेल्या आरोपांना शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

भारत बनला सर्वाधिक विजय मिळवणारा संघ!

“काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदाच समजल्या. माझा राजीनामा देण्याचा निर्णय सामूहिक होता.” असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे. तसेच “मी राजीनामा दिल्यानंतर कोणालाही राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायला लावले नव्हते”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. “मला स्वतःला निर्णय घेण्याची माझ्यात कुवत आहे. तसेच भाजपसोबत जाण्याची आमची भूमिका नव्हती. आज जे विरोध करत आहेत, त्यांनाच भाजपसोबत जायचे होते. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

“पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी करण्यापेक्षा आपण नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवले पाहिजेत. जर आम्ही आमच्या युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल. त्यामुळे आपण कामाला लागावे आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे करू शकलो तर, आम्ही तरूण नेते उदयास येताना पाहणार आहोत”, असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी व्हायरल

दरम्यान, अजित पवार यांनी कालच्या कर्जत येथील सभेत शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शरद पवारांनी काही नेत्यांना आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलने करण्यास सांगितले होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता.

One Comment on “अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *