शरद पवारांना पुन्हा समन्स

मुंबई, 28 एप्रिलः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आले आहे. हे समन्स भीमा कोरेगाव आयोगापुढे चौकशीसाठी देण्यात आले आहे. मुंबईत 5 आणि 6 मे 2022 रोजी होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी शरद पवारांना आयोगाने तिसरं समन्स बजावले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या घटनेनंतर राजभरात दंगली उसळली होती. पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकारकडून या प्रकरणात चौकशीसाठी आयोगाकडून कामकाज चालूच आहे.

‘भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे’, असं पवारांनी त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत.

त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *