अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून शरद पवारच गायब!

बारामती, 18 जुलैः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) जुलै महिना म्हटलं की बारामती नगरीमध्ये लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दरवर्षी नित्यनियमाने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत असतात. या बॅनरवर लाडक्या नेत्यांमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी त्यांचे मोठ मोठे फोटो असलेले बॅनर झळकत असतात. या बॅनर्सवर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो एकत्र असतात. मात्र यंदाचे चित्र वेगळेच आहेत.

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे वाढदिवस साजरे करताना राष्ट्रवादीकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांच्या बॅनर्सवर तीनही नेत्यांची फोटो लावलेली असतात. मात्र या वर्षी अजित पवारांच्या वाढदिवसांनिमित्त घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराच्या बॅनर्सवरून चक्क शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाच फोटो गायब झाल्याने बारामतीतही अजित पवार गट आणि शरद पवार गट झाल्याचे चित्र दिसत आहे.

मुर्टी गावात खाजगी कामासाठी वृक्षतोड!

दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादी पक्षात तर उभी फुट पडली, तसेच पवार कुटुंबियांमध्येही दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही कोणाच्या बाजूने जावे, हे समजत नसल्याचे चित्र बारामतीसह राज्यभरात आहे. ही गोष्ट आता बारामती नगरीत अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 22 जुलै रोजी महा रक्तदान शिबिरासह अन्नदान आणि नेत्रदान शिबिरासाठी लावलेल्या बॅनर्सवरून दिसत आहे.

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाआधी अजित पवार यांच्यासह बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शरद पवारांनी एक शब्दही न बोलल्याचे खुद्द प्रफुल पटेल यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा शरद पवारांची भेट घेण्यात आली. पण पुन्हा तेच पदरी पडले.

बारामतीत बोगस वसुली एजेंट विरोधात तक्रार दाखल

तत्पुर्वी, बारामतीतही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र ज्या शरद पवारांनी बारामतीचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले, स्वतःच्या हिम्मतीवर राष्ट्रवादीची सत्ता केंद्रासह राज्यात अनेक वर्षे आणली. त्यातून बारामतीच्या पदरात अनेक गोष्टी पडल्या, बारामतीकरांना अनेक गोष्टी मिळाल्यात, तसेच याचा सर्वात जास्त लाभार्थी खुद्द अजित पवार देखील आहेत. शरद पवारांना बघून सुरुवातीपासूनच अजित पवारांना बारामतीकरांनी भरभरून प्रेम दिले, आज त्याच प्रेमात दोन मतप्रवाह होताना दिसत आहे. आता तर अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती नगरीत लावलेल्या बॅनर्सवरून चक्क शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही फोटो गायब झाला आहे. त्यामुळे पक्ष फुटीसह पवार कुटुंबामध्येही फूट पडले की काय? असा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्यांना पडला आहे.

One Comment on “अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून शरद पवारच गायब!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *