शरद पवारांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट; केली प्रकृतीची विचारपूस

मुंबई, 6 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना काल दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना जळगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. या उपचारानंतर एकनाथ खडसे यांना काल सायंकाळी मुंबईतील रुग्णालयात एअर ॲम्ब्युलन्सने नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याठिकाणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे या उपस्थित होत्या. दरम्यान रोहिणी खडसे यांनी काल एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. आपल्या वडिलांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तत्पूर्वी एकनाथ खडसे यांना काल हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता.

सदावर्तेंनी पुकारलेल्या संपाला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही

“आपल्या वडिलांना मुंबईत आणण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी”, अशी विनंती रोहिणी खडसे यांनी तेंव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचे आदेश दिले. त्यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर खडसे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यावेळी त्यांच्या छातीत दुखत होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तत्पूर्वी एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची 2022 मध्ये विधान परिषदेवर निवड झाली होती. तर एकनाथ खडसे हे लवकर बरे व्हावेत, यासाठी कार्यकर्ते प्रार्थना करीत आहेत.

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय

One Comment on “शरद पवारांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट; केली प्रकृतीची विचारपूस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *