निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाची जोरदार बॅनरबाजी!

मुंबई, 07 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाच्या संदर्भात अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या निकालाच्या निषेधार्थ मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आज शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना समर्थन देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. यावेळी ‘जीत तो आज भी हमारी हुई है’, ‘चिन्ह तुम्हारा बाप हमारा’ अशा आशयाचे बॅनर्स मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1755122583618396219?s=19

https://twitter.com/ANI/status/1755139792478601309?s=19

शरद पवार गटाकडून निदर्शने

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या या निकालाविरोधात आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाच्या संदर्भात अजित पवार गटाच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

नावे सादर करण्यासाठी दुपारपर्यंतची मुदत

तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने या निकालानंतर शरद पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह यांची नावे सुचवण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे शरद पवार गट निवडणूक आयोगासमोर आज कोणती नावे सादर करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गट आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. आमदारांच्या आकड्यावरून पक्ष हा ठरत नसतो. पक्ष ही संघटना ठरवत असते, त्यामुळे अर्थातच संघटना ही शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे या निकालाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *