‘मायेचा एक घास जवानांसाठी’ उपक्रमास शरद पवारांकडून हिरवा झेंडा

बारामती, 26 ऑक्टोबरः सीमेवर तैनात भारतीय सैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘मायेचा एक घास जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत दिवाळी फराळ पाठवला जातो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते 25 ऑक्टोबर 2022 रोजी हिरवा झेंडा दाखवत बारामती येथून या फराळाच्या पेट्या रवाना करण्यात आल्या.

विनायक निम्हण यांचं निधन; सुप्रिया सुळेंकडून श्रद्धांजली

गेल्या सात वर्षांपासून संतोष चाकणकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील भगिनींच्या हातचा मायेचा फराळ व विद्यार्थ्यांचे शुभेच्छा संदेश भारतीय सीमेवरील जवानांसाठी पाठवले जातात. राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिवाळीच्या दरम्यान माता भगिनींनी बनवलेला ताजा फराळ घेऊन जवळपास सव्वाशे युवक सीमेवर जातात. अहोरात्र सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना कुटुंबासमवेत सणांचा आनंद घेता येत नाही.

गेल्या सात वर्षांपासून सीमेवर तैनात बीएसएफ जवानांसोबत ही दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी जम्मूच्या पुढे नांगरोटा भागामध्ये हा दिवाळी फराळ सुमारे 3 हजार सैनिकांसोबत आनंदमयी वातावरणात वाटला जाईल. शिवाय सोबत विद्यार्थ्यांची 11 हजार ग्रीटिंग कार्ड्सही आहेत. या उपक्रमामुळे सीमेवरील जवानांचे मनोबल असेच उंच राहण्यात मदत होईल. तसेच या उपक्रमासंदर्भात शरद पवारांकडूनही ट्वीट करण्यात आले आहे.

One Comment on “‘मायेचा एक घास जवानांसाठी’ उपक्रमास शरद पवारांकडून हिरवा झेंडा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *