शरद पवारांनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा!

मुंबई, 2 मेः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या पुढे शरद पवार हे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुनही निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई येथे ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांबद्दलही त्यांनी मोठं भाष्य केले आहे.

एम. पी. सय्यद यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून गौरव

या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, ‘1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ ‘तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल, असेही पवार म्हणाले.

जयंतीनिमित्त मूकबधिर आणि अंगणवाडी शाळेला वस्तू भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे. ही नवीन समिती अध्यक्ष पदासंदर्भात निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवा अध्यक्ष कोण मिळणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *