आजपासून शरद कृषी महोत्सवाला सुरुवात

इंदापूर, 8 डिसेंबरः इंदापूर शहरातील नवीन तहसिल कचेरी शेजारील प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शरद कृषी महोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन आज, 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2022 पर्यंत सर्वांसाठी खुले असणार असून, प्रदर्शनादरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.

शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अमोल घोडके यांची निवड

सदर महोत्सव इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केला आहे. यामध्ये शेतकरी, महिला, युवक यांच्यासाठी महोत्सव वरदान ठरणारा असणार आहे. या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात तब्बल 200 प्रकारचे विविध स्टॉल्स असणार आहेत. यात राज्यातील नामांकित कृषी कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच पिकांच्या वाढीसाठी परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यावेळी नामांकित वक्ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, दत्तात्रय भरणे यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली.

बारामतीच्या ‘या’ गावावर पाणी संकट!

या महोत्सवाचे उद्‌घाटन आज, गुरुवारी 8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर शुक्रवारी सकाळी 11 वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा व महिला मेळावा होणार आहे. या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजता खासदार अमोल कोल्हे, दत्तात्रय भरणे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत युवक मेळावा होणार आहे. तर रविवारी सायंकाळी 5 वाजता शेतकरी मेळावा व 12 डिसेंबर रोजी 5 वाजता या कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे.

One Comment on “आजपासून शरद कृषी महोत्सवाला सुरुवात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *