महसूल विभागाचा सावळा गोंधळ; ई-पिक पाहणी अ‍ॅप बंद?

पुणे, 7 जुलैः पुणे जिल्ह्यात ई-पिक पाहणी अ‍ॅप गेले महिनाभर अकार्यरत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहे. ई-पिक पाहणी अ‍ॅप बंद पडल्याने पीक नोंदणी, विहीर नोंदणी प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक, पाणी कर्ज मिळणार नाही, असे झाले आहे. त्यामुळे खाजगी सावकारांकडून कर्ज काढून पुढील मशागत पेरण्या शेतकरी करत आहे.

अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे आमदार पडळकरांच्या हस्ते अनावरण

तसेच गाव कामगार तलाठी प्रत्यक्ष पाहणे करून पीक नोंदनी करण्यास असमर्थता दाखवत असल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. विकास सोसायट्या, कृषी पतपिढ्या, बँका शेतकऱ्यांना आर्थिक पुरवठा करण्यास असमर्थता दाखवत आहे. त्यामुळे लांबलेल्या पावसाने त्रासलेल्या शेतकरी आसमानी संकटाप्रमाणेच प्रशासकीय संकटालाही तोंड देत आहे. ई पिक पाहणी अ‍ॅप तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.

जखमी मोराला भोसले परिवारांकडून जीवदान

One Comment on “महसूल विभागाचा सावळा गोंधळ; ई-पिक पाहणी अ‍ॅप बंद?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *