बारामती, 15 मेः बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील एका युवकावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून झारगडवाडी येथील अविनाश गुलाब मासाळ (वय-22) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून झारगडवाडी येथील संशयित आरोपी अविनाश गुलाब मासाळ (वय 22) हे एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी आहेत. त्याची ओळख इन्स्टाग्रामवरून फलटण येथील पीडित युवती (वय 20) शी 9 महिन्यांपूर्वी झाली. इंस्टाग्राम वरून संवाद साधत असताना प्रत्यक्षात त्या दोघांच्या गाटीभेटी होऊ लागल्या. या गाटीभेटीत त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. यातूनट त्या दोघांचे शारीरिक संबंध आले. संशयित आरोपी अविनाश मासाळ याने पीडित युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक संमती मिळवली. मात्र ज्यावेळी युवतीने लग्नाचे गोष्ट केली, त्यावेळी संशयित आरोपी अविनाश मासाळ त्या मुलीला धमकी देऊ लागला. तसेच लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान, त्यांच्या अनेक भेट बारामतीमध्ये लॉजला झाल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सदर प्रकरणात संशयित आरोपी अविनाश मासाळ याच्या विरोधात भादवि कलम 376 प्रमाणे व कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे हे करत आहेत.