इंदापुरात दरोड्यांचे सत्र सुरूच

इंदापूर, 17 सप्टेंबरः इंदापूर तालुक्यातील डाळज क्र. 1 येथे अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून घरात घुसून तब्बल 4 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे डाळजसह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवण पोलीस ठाण्यात सदर जबरी चोरीबाबत डाळज क्र. 1 येथील प्रकाश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सांगवीत निर्यातक्षम भाजीपाला पिकाची लागवड व शेतीशाळा संपन्न

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळज क्र. 1 येथील फिर्यादीच्या घरी गुरुवारी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी सकाळी 7 ते दुपारी 3 च्या सुमारास घराचा कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोख रक्कम 7 हजार, 3 तोळ्याचा राणीहार, 4 तोळ्याच्या बांगड्या, 4 सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 4 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *