गुणवडीत अवैध दारू विक्रेत्यावर सेशन कमिट गुन्हा दाखल

बारामती, 2 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील गुणवडी गावात शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत अवैध गावठी हातभट्टीवर धाड टाकली. सदर कारवाई तब्बल 20 लिटरची गावठी हातभट्टी दारूचा कॅन मिळाला. मात्र पोलीस येण्याआधीच सदर ठिकाणावरून दोन तीन जण उसातून पळून गेले.

सदर कारवाईत गुणवडी येथील ढेले वस्तीमधील संदीप ऊर्फ दाद्या सकट (वय 27) याच्या विरोधात भादवि कलम 328 नुसार, तसेच दारूबंदी कायदा कलम 65 फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून, संशयित आरोपी संदीप ऊर्फ दाद्या सकट हा त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने गावात गावठी हातभट्टी दारू आणून विक्री करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, माने, ढोले, महिला पोलीस कर्मचारी निगडे यांना सदर ठिकाणी पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. या पथकाने सदर इसमाचे घर व त्याच्या आजूबाजूला असणारी ऊसाची शेतीची पाहणी केली. सदर ठिकाणी 20 लिटर गावठी हदभट्टी दारूचा कॅन मिळाला. त्या ठिकाणावरून दारू पिणारे दोन-तीन लोक उसात पळून गेले. पोलिसांची चाहूल लागताच दारू विक्रेता संशयित आरोपी संदीप सकट अगोदरच पलायन झाला होता.

माळेगाव ताडी प्रकरणात मोठी अपडेट

सदर गुन्ह्याचा तपास बीट अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे हे करत आहेत. दरम्यान, काल रात्री सुद्धा साठे नगर परिसरामध्ये अवैध दारू बाबत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

2 Comments on “गुणवडीत अवैध दारू विक्रेत्यावर सेशन कमिट गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *