पुण्यात खळबळजनक घटना; तरूणीचा हात, पाय, डोके नसलेला मृतदेह सापडला

पुणे, 27 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील मुळा नदीच्या काठावर मंगळवारी एका तरूणीचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नदीपात्रात आढळून आलेल्या या मृतदेहाला डोके, हात आणि पाय नाहीत. दरम्यान, आरोपीने तरूणीची हत्या केल्यानंतर तिचे हात, पाय, डोके कापून धड नदीपात्रात फेकून दिले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठविला आहे. या तरूणीची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सध्या भीती व्यक्त केली जात आहे.

चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यातील खराडी जवळील मुळा नदीत एका तरूणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या मृतदेहाला हात, पाय आणि डोके नाहीत. अशा परिस्थितीत या तरूणीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे या मृतदेहाच्या उर्वरित अवयवांचा सध्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, ही मृत तरूणी 18 ते 30 वयोगटातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच या तरूणीची हत्या कोणी केली? याचा शोध ही पोलिसांकडून घेतला जात आहे.

पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे केल्याचा संशय

दरम्यान, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने या तरूणीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले असावे आणि त्यानंतर त्याने तिचा मृतदेह नदीत फेकला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *