बारामती एमआयडीसीतील लाखोंच्या चोरीत खळबळजनक खुलासा

बारामती, 19 ऑक्टोबरः बारामती एमआयडीसीमधून तब्बल 21 लाख रुपयांचे लोखंडी रोल चोरी गेल्याची घटना घडली. सदर चोरीच्या घटनेत बारामती तालुका पोलिसांनी धमाकेदार कामगिरी करत 26 लाखांच्या मुद्देमालासह चोरीसाठी वापरलेले वाहन मिळून तब्बल 31 लाखांची रिकव्हरी केली आहे. सदर चोरीच्या प्रकरणात कंपनीच्या सेक्युरिटी गार्डसह अन्य चौघांना अटक केली आहे.

सदर प्रकरणात संशयित आरोपी सिक्युरिटी गार्ड कैलास लष्कर (रा. राक्षेवाडी ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर), आकाश ननवरे (वय 21), आशिष लष्कर (वय 20), आकाश जाधव (वय 19) (सर्व राहणार राक्षेवाडी ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर), तेजस लोंकलकर उर्फ तेजा शेठ (वय 40, रा. तुळजाभवानी नगर, जालना) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तब्बल 1000 झाडांचे वृक्षारोपण

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, बारामती एमआयडीसी येथील आयएसएमटी कंपनीत 20 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 दरम्यान अज्ञान चोरांनी कंपाउंडमधून प्रवेश करून तब्बल 26 लाख रुपयांचे लोखंडी रोल नेल्याची घटना घडली. सदर घटनेची तक्रार 4 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे मॅनेजर संजय मसतुद यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सदर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक गठीत केले. तपास पथकातील पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने, शशिकांत दळवी व दीपक दराडे यांनी रात्रंदिवस आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकास गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. आयएसएमटी कंपनीमधीलच सेक्युरिटी गार्ड कैलास लष्कर आणि त्यांच्या साथीदाराने सदर चोरी केल्याचे तपासात खळबळजनक माहिती उघड झाली.

बारामती नगर परिषदेची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई

कंपनीचा सिक्युरिटी गार्ड कैलास लष्कर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून लोखंडी रोलची चोरी केली. चोरलेले लोखंड बारामती येथील सलमान खान आणि भिगवण येथील धर्मेंद्रकुमार चौधरी यांना विकला. त्या दोघांनी चोरीचे लोखंड पुढे जालना येथील तेजस लोंकलकर उर्फ तेजा शेठ यांना विकला. सदर आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील राशीन गावातून तसेच बारामतीमधून अटक करण्यात आली. तसेच जालना येथून तेजस लोंकलकर याला ताब्यात घेण्यात आले.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे मॅडम, सपोनी राहुल घुगे तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे जालना येथे पोहोचले. गुन्हेगारांना तर पकडलेच तसेच जालना येथून सदर गुन्ह्यातील 100 टक्के रिकवरी करून लोखंड जालन्यावरून परत बारामतीला आणले. त्यामुळे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन मिळून 31 लाख रुपयांची रिकव्हरी करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीणच्या बारामती विभागचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, पो. कॉ. दत्ता मदने, शशिकांत दळवी, दीपक दराडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रचना काळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे या करीत आहेत.

One Comment on “बारामती एमआयडीसीतील लाखोंच्या चोरीत खळबळजनक खुलासा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *