जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई, 13 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर एका दिवसातच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच काँग्रेसचे माजी आमदार अमर राजुरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे स्वागत केले. आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1757310404563214669?s=19

अशोक चव्हाण यांच्या येण्याने भाजपची ताकद वाढणार: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व, गेली अनेक वर्षे राज्याची विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदे ज्यांनी भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली. असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच अशोक चव्हाण यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मोदींसारख्या मजबूत नेतृत्वात काम करावे ही अनेक नेत्यांची इच्छा: फडणवीस

देशभरात पंतप्रधान मोदी यांनी ज्याप्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केले आणि जे परिवर्तन भारतात दिसायला लागले. त्यामुळे देशभरातील अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्यप्रवाहामध्ये काम करावे, मोदींसारख्या एका मजबूत नेतृत्वात काम करावे. नरेंद्र मोदी यांचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, या प्रयत्नांमध्ये आपणही वाटा उचलावा असे विचार अनेक नेत्यांमध्ये आला आहे. यामधील प्रमुख नेतृत्व म्हणून आपण अशोक चव्हाण यांच्याकडे बघू शकतो, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *