दिल्ली, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे माजी उप पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना नियमित तपासणीसाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. ते आता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लालकृष्ण अडवाणी हे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच वैद्यकीय बुलेटिन जारी केले जाण्याची शक्यता आहे.
https://x.com/PTI_News/status/1867795661439045973?t=m4XRk-mQBZNTuibXVwfi8Q&s=19
लालकृष्ण अडवाणी हे सध्या 97 वर्षांचे आहेत. प्रकृती खालावल्याने शुक्रवारी (दि.13) रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या काही महिन्यांत अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना यापूर्वी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेंव्हा एक दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. सध्या ते अपोलो रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
लालकृष्ण अडवाणी यांची माहिती
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते 1942 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले. लालकृष्ण अडवाणी हे 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये 1999 ते 2005 या काळात केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवले होते. लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते.