पुणे, 22 ऑक्टोबरः वंचित बहुजन आघाडीची पुणे जिल्हा कार्यकारिणी 21 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणी ही पुण्यातील पुर्व भागातील असून यात एकूण 12 पदाधिकाऱ्यांची नावे आहे. यात बारामतीचे सुजय रणदिवे यांची वंचितच्या जिल्हा संघटक पदी निवड जाहीर झाली आहे. सदर पदाधिकाऱ्यांची निवड वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी जाहीर केली आहे.
लाभार्थ्यांना तब्बल 2 कोटी 18 लाखांचे अनुदान वाटप
वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे काम करणारा आहे. तसेच पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, त्याची मी प्रामाणिकपणे काम करून पक्षासाठी अनेक वंचित घटकांना सोबत घेऊन पक्षाची विचारधारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणार आहे. तसेच प्रकाश आंबेडकर आणि रेखा ठाकूर यांनी दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीचा मी ऋणी आहे. जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार यांच्या साथीने व त्यांच्या बरोबरीने काम करेल तसेच गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा मानस असल्याचे सुजय रणदिवे यांनी ‘भारतीय नायक’ बोलताना सांगितले.
One Comment on “वंचितच्या जिल्हा संघटक पदी सुजय रणदिवे यांची निवड”