बारामती, 15 जूनः सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सलग्न असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता हक्क संरक्षण महासंघ बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी बारामती तालुक्यातील मुर्टी येथील शरद भगत यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड सजीव संरक्षण जागृती बहुद्देशीय सामाजिक संस्था भारत चे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडीक यांनी केली.
मुर्टी गावात उद्योग अनुदानावर पी. टी. काळे यांचे मार्गदर्शन
संविधानिक कायद्याचे पालन करुन व बारामती तालुक्यात गावोगावी शाखा स्थापन करणार असल्याची माहीती शरद भगत यांनी दिली आहे. तर माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले, खोट्या केसेस किंवा अन्य समस्या सोडविण्यासाठी सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय सामाजीक संस्थेच्या सलग्न माहिती अधिकार संरक्षण महासंघाची निर्मिती केल्याचे भालचंद्र महाडीक यांनी सांगितले.
महावितरणचा हलगर्जीपणा आदित्यच्या जीवावर बेतला; 70 ते 75 टक्के भाजला
2 Comments on “माहिती अधिकार कार्यकर्ता हक्क अधिकार संरक्षण महासंघाच्या प्रसिद्धीपदी शरद भगत यांची निवड”