वंचितच्या तालुका संघटक पदी सागर गवळी यांची निवड

बारामती, 13 जानेवारीः बारामतीत नुकतीच बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकारणी संबंधात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी असंख्य कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या. सदर मुलाखतीमध्ये ज्या कार्यकर्त्यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे, जो चेहरा युवकांमध्ये नेहमी दिसतो आणि त्यामध्ये संघटन कौशल्य आहे, असे सागर गवळी यांची नियुक्ती बारामती तालुका संघटन पदी करण्यात आली.

मुर्टीमध्ये राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद यांची जयंती साजरी

नियुक्तीनंतर सागर गवळी यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले की, जी संघटक पदाची जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे, ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडून माझ्या संघटन कौशल्याचा वापर पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी करील. आणि पक्षासाठी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण करेल. जेणेकरून पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, यासाठी अधिक प्रयत्न करेल.

बारामतीच्या तहसिल कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार

तसेच बारामती तालुक्यातील प्रत्येक गावोगावी संघटन निर्माण करून येणारी निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याचेही सागर गवळी यांनी सांगितले.

One Comment on “वंचितच्या तालुका संघटक पदी सागर गवळी यांची निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *