फलटण, 28 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) जय मल्हार क्रांती संघटनेची सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावात जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली. या वार्षिक सभेसाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुश जाधव, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवकाध्यक्ष सुधीर नाईक, तसेच राज्याच्या अनेक भागातून जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःचे जीवन संपवले; शिक्षकाचे टोकाचे पाऊल
या सभेत अनेक कार्यकर्त्यांना नव्याने पदभार दिला. बारामती तालुक्यातील मोरगाव गावामधील रविंद्र जाधव यांची युवक महाराष्ट्र राज्य युवक मुख्य संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली.
कैद्यांच्या तात्काळ सुटकेसाठी सुप्रीम कोर्टाने पोर्टल सुरू केले
समाजासाठी व जय मल्हार क्रांती संघटनेसाठी मी कायम काम करेल, असे आश्वासन रविंद्र जाधव यांनी दिले. रविंद्र जाधव यांना कै.प्रसाद महेश जाधव युथ फांऊडेशन व रविंद्र (बापु) जाधव फ्रेंड सर्कल यांनी शुभेच्छा दिल्या.
One Comment on “जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य युवक मुख्य संपर्क प्रमुख पदी रविंद्र जाधवांची निवड”