बारामती, 4 जुलैः बारामती दूध संघाच्या नूतन संचालक मंडळाची निवड 3 जुलै 2023 रोजी पार पडली. या निवडतून बारामती दूध संघाच्या चेअरमन पदी कऱ्हावागजचे पोपटराव सोमनाथ गावडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी मुर्टी येथील संतोष मारुती शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवार भाजपसोबत
दरम्यान, बारामती दूध संघाच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाच्या निवडीच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकरांनी चेअरमन पोपटराव गावडे तर व्हाईस चेअरमन पदी संतोष शिंदेंच्या नावाची घोषणा केली.
वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
या प्रसंगी संभाजी होळकर, निवडणूक अधिकारी सुधीर खांबायत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, बारामती खरेदी-विक्री संघाचे सभापती दत्तात्रय आवळे व डॉ.अनिल ढोपे आदींसह संचालक मंडळ, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
One Comment on “बारामती दूध संघाच्या चेअरमन पदी पोपटराव गावडे यांची निवड”