मोरगाव, 6 जुलैः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मोरगाव जवळील खंडुखैरेवाडी येथील मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नुकताच महिंद्रा अॅन्ड महिंद्रा चाकण, पुणे, संजोत कॉर्पोरेशन पिंपरी- चिंचवड पुणे या कंपनीच्या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कंपनीमार्फत कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्हूय घेण्यात आले. यामध्ये मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील तब्बल 40 विद्यार्थ्याची निवड झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बारामतीत अजित पवारांसाठी भाजपकडून बॅनरबाजी; कार्यकर्ते मात्र संभ्रमात
मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यवसायीक शिक्षणाच्या माध्यमातून फिटर, वेल्डर, वायरमन, इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधील इंडस्ट्रीजमध्ये काम करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाद्वारे तसेच अनेक मशिनद्वारे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे या संस्थेमार्फत मिळणाऱ्या हमखास नौकरीमुळे या वर्षी नविन प्रवेशासाठी खुप गर्दी होत असल्याचे संस्थेचे प्राचार्य उद्धव वाबळे सरांनी सांगितले.
बारामती दूध संघाच्या चेअरमन पदी पोपटराव गावडे यांची निवड
तसेच कंपनीमध्ये 40 प्रशिक्षणार्थ्यांची भरती मेळाव्यामध्ये निवड झाल्याने संस्थेच्या सचिव मनिषा खैरे व संस्थेचे अध्यक्ष दिलिप खैरे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
2 Comments on “मयुरेश्वर आयटीआयच्या 40 विद्यार्थ्यांची महिंद्रा कंपनीत निवड”