पाहा राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांचा अचूक निकाल!

मुंबई, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा जिंकण्यात यश आले. तर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रत्येकी 9 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 8 जागा, शिवसेना 7 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1 जागा आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला.

उमेदवार किती मतांनी विजयी?

* नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे 1 लाख 59 हजार 120 मतांनी विजय झाले आहेत.

* धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव या 3 हजार 831 मतांनी विजयी ठरल्या आहेत.

* जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या 2 लाख 51 हजार 594 मतांनी विजयी झाल्या.

* रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे 2 लाख 72 हजार 183 मतांनी विजयी झाल्या.

* बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे 29 हजार 479 मतांनी विजयी झाले.

* अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे यांनी 40 हजार 626 मतांनी विजय मिळवला आहे.

* अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे यांनी 19 हजार 731 मतांनी विजय मिळवला आहे.

* वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे हे 81 हजार 648 मतांनी विजयी झाले.

* रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी 76 हजार 768 मतांनी विजय मिळवला आहे.

* नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांनी 1 लाख 37 हजार 603 मतांनी विजय मिळवला आहे.

* भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पडोले यांनी 37 हजार 380 मतांनी विजय मिळवला आहे.

* गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान 1 लाख 41 हजार 696 मतांनी विजयी झाले.

* चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजयी झाल्या.

* यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख हे 94 हजार 473 मतांनी विजयी झाले.

* हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश आष्टीकर पाटील यांनी 1 लाख 08 हजार 602 मतांनी विजय मिळवला आहे.

* नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी 59 हजार 442 मतांनी विजय मिळवला आहे.

* परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव यांनी 1 लाख 34 हजार 061 मतांनी विजय मिळवला आहे.

* जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कल्याण काळे यांनी 1 लाख 09 हजार 958 मतांनी विजय मिळवला आहे.

* औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे संदिपानराव भुमरे यांनी 1 लाख 34 हजार 650 मतांनी विजय मिळवला आहे.

* दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजय मिळवला आहे.

* नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 62 हजार 001 मतांनी विजय मिळवला आहे.

* पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत सावरा यांनी 1 लाख 83 हजार 306 मतांनी विजय मिळवला आहे.

* भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे यांनी 66 हजार 121 मतांनी विजय मिळवला आहे.

* कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी 2 लाख 09 हजार 144 मतांनी विजय मिळवला आहे.

* ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी 2 लाख 17 हजार 011 मतांनी विजय मिळवला आहे.

* मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल यांनी 3 लाख 57 हजार 608 मतांनी विजय मिळवला आहे.

* मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी विजय मिळवला आहे.

* मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पाटील यांनी 29 हजार 861 मतांनी विजय मिळवला आहे.

* मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या 16 हजार 514 मतांनी विजयी झाल्या आहेत.

* मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला आहे.

* मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी 52 हजार 673 मतांनी विजय मिळवला आहे.

* रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांनी 82 हजार 784 मतांनी विजय मिळवला आहे.

* मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी 96 हजार 615 मतांनी विजय मिळवला आहे.

* पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी 1 लाख 23 हजार 038 मतांनी विजय मिळवला आहे.

* बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार 333 मतांनी विजय मिळवला आहे.

* शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे हे 1 लाख 40 हजार 951 मतांनी विजयी झाले.

* अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी 28 हजार 929 मतांनी विजय मिळवला आहे.

* शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50 हजार 529 मतांनी विजय मिळवला.

* बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 553 मतांनी विजय मिळवला.

* उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश निंबाळकर यांनी 3 लाख 29 हजार 846 मतांनी विजय मिळवला आहे.

* लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी 61 हजार 881 मतांनी विजय मिळवला.

* सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी 74 हजार 197 मतांनी विजय मिळवला.

* माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 1 लाख 20 हजार 837 मतांनी विजय मिळवला आहे.

* सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 1 लाख 053 मतांनी विजय मिळवला आहे.

* सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 32 हजार 771 मतांनी विजय मिळवला आहे.

* रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे यांनी 47 हजार 858 मतांनी विजय मिळवला आहे.

* कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 54 हजार 964 मतांनी विजय मिळवला आहे.

* हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे धैर्यशील माने यांनी 13 हजार 426 मतांनी विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *