बारामती, 7 ऑक्टोबरः बारामती उपविभागात मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ) (यु) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून बारामती उपविभागीय दंडाधिकारी यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आदेश दिले आहेत.
वर्धापण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
या आदेशानुसार शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे व कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. हे आदेश बारामती उपविभागात 11 ते 26 ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी लागू राहतील.
प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.