जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा शोध सुरू

पूंछ, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील राजौरी परिसरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले आहेत.तर यामध्ये 3 जवान जखमी झाले आहेत. त्यानंतर हा हल्ला करून ते सर्व दहशतवादी फरार झाले होते. या दहशतवाद्यांचा शोध सध्या घेतला जात आहे. हे दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बफलियाजच्या जंगलात लपून बसलेले आहेत. सध्या त्यांना पकडण्यासाठी लष्कराचे जवान प्रयत्न करीत आहेत.

https://twitter.com/ani_digital/status/1739165988879204530?s=19

https://twitter.com/adgpi/status/1738548583769759899?s=19

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत डेरा आणि गली आणि बफलियाज दरम्यानच्या रस्त्यावर 13 डिसेंबर रोजी लष्कराच्या जवानांना शोध मोहिमेच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर या दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी दहशतवाद्यांच्या या हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात याठिकाणी बरेच तास चकमक सुरू होती. तेंव्हापासून हे दहशतवादी फरार झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यात नाईक बिरेंद्र सिंग, नाईक करण कुमार, रायफलमॅन चंदन कुमार आणि रायफलमन गौतम कुमार हे 4 जवान शहीद झाले आहेत. त्यांना काल पुष्पहार अर्पण समारंभात भारतीय लष्कराने श्रद्धांजली वाहिली.



पूंछ जिल्ह्यातील बाफलियाजच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सध्या सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत. तसेच बाफलियाज भागात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर परिसरात 3 नागरिकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या तपासात पूर्ण सहकार्य देण्यास भारतीय लष्कर वचनबद्ध आहे. असे ट्विट भारतीय लष्कराने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *