अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम बारामती दौऱ्यावर!

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम बारामती दौऱ्यावर

बारामती, 27 फेब्रुवारी: अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम हे 28 फेब्रुवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. ते 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बारामती येथील भिगवण रोड लगत सीटी हॉटेल शेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करणार आहेत. या ठिकाणी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अनुसूचित जाती-जमातीतील पीडित तसेच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी हजर राहून आपापले म्हणणे किंवा आपली गाऱ्हाणी लेखी स्वरूपात मांडावीत, असे आवाहन ॲड. अक्षय गायकवाड यांनी केले आहे.

धर्मपाल मेश्राम यांचा 28 फेब्रुवारीचा दौरा

सकाळी 6.50: छत्रपती संभाजीनगरहून विमानाने मुंबईला रवाना.
सकाळी 7.55: मुंबई विमानतळावर आगमन.
सकाळी 8.30: मुंबईहून कारने पुणे जिल्ह्यातील भोरकडे प्रस्थान.
दुपारी 12.30: भोर येथे विक्रम दादासाहेब गायकवाड हत्या प्रकरणी पुण्याच्या पोलीस अधीक्षक आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसोबत बैठक व तपासाचा आढावा.
दुपारी 3.00: भोरवरून बारामती तालुक्यातील माळेगाव येथे रवाना आणि ॲड. अक्षय गायकवाड यांच्या तक्रारीसंदर्भात आढावा बैठक. त्यानंतर बारामतीतील गेस्ट हाऊस येथे मुक्काम.
दरम्यान, धर्मपाल मेश्राम हे 1 मार्च रोजी सोयीनुसार नवी मुंबईकडे रवाना होतील आणि मुक्काम करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *