अनुसूचित जातीचा नगरपरिषदेविराधात एल्गार

बारामती, 9 जूनः बारामती नगरपरिषद प्रभाग रचनेमध्ये झालेल्या गोर अन्यायाविरोधात 8 जून 2022 रोजी माता रमाई भवन येथे सायंकाळी 6 वाजता बैठक संपन्न झाली. या बैठकीला बारामती नगर पालिका हद्दीतील मागासवर्गीय विभागातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. बारामती नगर पालिका प्रशासक व शासक यांनी अनुसूचित जातीवर केलेला अन्यायाविरुद्ध कार्यकर्त्यांनी आपली जहाल मते व्यक्त केली. सातत्याने अनुसूचित जातीवर होत असलेल्या विकासमय अन्यायाबद्दल मत व्यक्त करण्यात आले. अनुसूचित जातीचा निधी इतरत्र विकासमय निधी वापरल्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. या अन्यायाला प्रभाग रचना कारणीभूत आहे, याबद्दल सर्वांचे एकमत झाले.

अनुसूचित जातीचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे कट-कारस्थान केले जात असल्याचे प्रतिपादन कार्यकर्त्यांनी केले. प्रभाग रचने विरुद्ध लढताना कृती आराखडा सर्वांन मतांनी तयार करण्यात आला असून या बद्दल एक निषेध पत्रक प्रसिद्ध करण्याचे निश्चित झाले आहे. तदनंतर प्रभाग रचना आरक्षण यामध्ये बदल व निधी वाटपातील अफरातफरीबद्दल तज्ञ लोकांचा परिसंवाद व मार्गदर्शन आयोजित करण्याचे ठरले आहे. अनुसूचित जाती जमातीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध व होऊ घातलेल्या दूष परिणामाबद्दल धडक मोर्चा काढण्याचे एकमताने ठरले आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या प्रत्येक गल्लीमध्ये घोंगडी बैठक घेऊन लोकांमध्ये झालेल्या अन्यायाबद्दल जागृती निर्माण करणे व अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे एक मत झाले आहे.

अभिजीत कांबळे, सुजय रंधवे, रविंद्र सोनवणे, सचिन साबळे, स्वप्निल कांबळे, दयावान दामोदरे, सुरज देवकाते, चंद्रकांत माने, रणजित कांबळे, चैतन्य गालिंदे, निलेश शेंडगे, नंदू खरात, साजन आडसूळ, मंगलदास निकाळजे, अमर भंडारी, अभिलाश भोसले, जितेंद्र जगताप, अमित सोनवणे,  विजय सोनवणे, आकाश कांबळे, मोहीम बागवान आदी तरुणांनी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *