बारामती, 24 एप्रिलः बारामती शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात नुकतीच भाजप अनुसूचीत जाती मोर्चाची बैठक संपन्न झाली. ही बैठक भाजप महाराष्ट्र प्रदेश अनुसूचीत जाती मोर्चा चिटणीस यशपाल भोसले यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
या बैठकीत अनुसूचीत जाती मोर्चा बारामती शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात चैतन्य गालिंदे यांना अनुसूचीत जाती मोर्चा शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तर शैलेश खरात यांना अनुसूचीत जाती मोर्चा शहर संघटक सरचिटणीस, निलेश त्रिमुखे यांना अनुसूचीत जाती मोर्चा शहर सहसरचिटणीस या पदाची जबाबदारी देण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी यशपाल भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य अनुसूचीत जाती मोर्चा सचिन साबळे, बारामती शहराध्यक्ष सतीश फाळके, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड, पुणे जिल्हा अनुसूचीत जाती मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक सचिन मोरे, पुणे जिल्हा अनुसूचीत जाती मोर्चा चिटणीस साजन अडसुळ यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.