बारामती, 31 जानेवारीः बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील संत सावतामाळी इंग्लिश मीडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कोरोना काळातील नागरीकांनी एकमेकांना केलेले सहाय्य, लोक संगीत, मोबाईलचे दुष्परिणाम, देशभक्ती आदी गीतांना प्रेक्षकांनी उस्फुर्त दाद दिली.
डोर्लेवाडी येथील विद्यालयात 15व्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक किरण गुजर, ज्योतिचंद भाईचंद सराफचे एमडी शांतीकुमार सराफ, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, लीड शिक्षण संस्थेचे कैलास गुप्ता, शांताराम देशमुख, भाजपचे दिलीप खैरे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित निंबाळकर, अध्यक्ष सुमित्रा निंबाळकर, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात, राजेंद्र बोरकर, पीडीसी बॅंकेनचे शाखाप्रमुख रोहित मोरे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामतीमधील हुतात्मा स्तंभाला अभिवादन
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात मुलांनी सादर केलेल्या गणेश वंदना, देशभक्तीपर गीत, हिंदी मराठी लोकगीते आदी गीतांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मोबाईल वापराचे दुष्परिणा, शिक्षणाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. कोरोना काळ व नंतरची परिस्थिती, भारत मातेच्या रक्षणासाठी सैनिकांचे असलेले कार्य व राजे शिव छत्रपती यांच्या गीतातून सादर केलेल्या देखाव्याने उपस्थित भारावून गेले होते.
सदर कार्यक्रमात सोमनाथ भिले यांनी प्रास्ताविक केले. राधा निलाखे, आर्या बोडरे, मुख्यायाध्यापक पृथ्वीराज नवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत निंबाळकर यांनी आभार मानले.
विधी संघर्षग्रस्त बालिकेकडून घरफोडी उघड
One Comment on “सावतामाळी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न”