बारामती, 20 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 चे मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकींचा आज, 20 डिसेंबर 2022 रोजी निकाल जाहीर होत आहे. ताज्या माहितीनुसार, 13 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत.
बारामतीत उद्या बंदची हाक!
बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. काही ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक ही चुरशीची ठरली तर काही ठिकाणी एकहाती मतदान झाल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंच पदाच्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
मतदानाच्या हक्कासाठी खर्च केले तब्बल 80 हजार!
1) लोणीभापकर ग्रामपंचायत- गीतांजली रवींद्र भापकर
2) काऱ्हाटी ग्रामपंचायत- दिपाली योगेश लोणकर
3) वानेवाडी ग्रामपंचायत- गीतांजली दिग्विजय जगताप
4) कुरणेवाडी ग्रामपंचायत- आशा किसन काळभोर
5) मासाळवाडी ग्रामपंचायत- मुरलीधर किसन ठोंबरे
6) मुरूम ग्रामपंचायत- संजयकुमार नामदेव शिंगटे
7) मोरगांव ग्रामपंचायत- अलका पोपट तावर.
8) पळशी ग्रामपंचायत- ताई माणिक काळे
9) गरदडदवाडी ग्रामपंचायत- मान पांडुरंग गरदडे
10) सोरटेवाडी ग्रामपंचायत- भारती अनिरुद्ध सोरटे
11) वाघाळवाडी ग्रामपंचायत- हेमत विलास गायकवाड
12) पणदरे ग्रामपंचायत- सोनवणे अजय कृष्णा
13) सोनकसवाडी ग्रामपंचायत- कोकरे राणी सतिश
सदर माहिती बारामती तहसिल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
One Comment on “बारामतीतील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा निकाल जाहीर!”