बारामती, 27 जुलैः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावात आज, 27 जुलै 2023 रोजी सकाळी प्रधानमंत्री किसान योजना संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाला कृषी सेवक व ग्रामपंचायतचे सरपंच किंवा प्रशासक हे हजर असणे आवश्यक होते. परंतु मुर्टी ग्रामपंचायतमध्ये अशा प्रकारचे काहीही घडलेले दिसले नाही.
चायना मांजामध्ये अडकलेल्या घुबडला दिले जीवदान
मुर्टी ग्रामपंचायत कार्यालयात आज, सकाळी 10 वाजता कृषी अधिकारी मंदार माने हे हजर होते. परंतु या संमेलनाला मुर्टी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी अक्षरशः पाठ फिरवलेली दिसले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व माहितीसाठी कृषी विभागाने घेतलेल्या किसान कृषी संमेलनाला यापैकी कोणीही हजर नव्हते. अशीच परिस्थिती ही मागील आठवड्यामध्ये झालेल्या शासन आपले दारी या कार्यक्रमातही दिसली.
शासन आपल्या दारी योजना फक्त कागदावरच?
याही कार्यक्रमाला वरील नेते मंडळी हजर नसल्याने मुर्टी ग्रामस्थांना जी शासनाच्या योजना आहेत त्याची माहिती वेळेवर मिळत नाही. परिणामी ग्रामस्थांना संबंधित कार्यलयामध्ये सतत हेलपाटे मारावे लागतात. तरी शासनाने ठोस पावले उचलून हे कार्यक्रम सक्षम होतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
One Comment on “पीएम किसान योजना संमेलनाला सरपंच, उपसरपंच गैरहजर!”