मुंबई, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. तसेच शस्त्रांसोबत असलेल्या लोकांचे व्हायरल होत असलेले फोटो खरे असल्यास त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
https://x.com/ANI/status/1872995236659798360?t=NFVUHQu1Nwf4YS1aEtKqbA&s=19
तीन आरोपी फरार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हे हत्या प्रकरण पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचा अंदाज आहे. संतोष देशमुख यांनी त्या खंडणी प्रकरणात प्रकरणात हस्तक्षेप केला होता. त्यामुळे आरोपींनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
संतोष देशमुख यांची 11 डिसेंबर 2024 रोजी रात्री आरोपींनी त्यांच्या गाडीतून अपहरण करून त्यांना जबर मारहाण केली गेली होती. त्यानंतर काही तासांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येनंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांनी आंदोलन केले. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून, पोलिसांनी विविध पथकांच्या माध्यमातून तपास सुरू ठेवला आहे.