बारामती, 18 जूनः बारामती येथील साप्ताहिक वादग्रस्त या वृत्तपत्राचे संपादक संतोष जाधव यांच्यावर वसंतनगर येथील एका विवाहित महिलेने छेडछाड आणि विनयभंग आदी भा.द. वि. कलम 354,452,294,504,506,269,270 तसेच साथीरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2,3,4 अन्वये बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात संशयित आरोपी संतोष जाधव यांना अटक होऊन जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण होऊन दोषारोप पत्र दाखल होऊन खटला न्यायाधिश ए. जे. गिऱ्हे यांच्या कोर्टात सुरु होता.
आरोपीच्या वतीने अॅड. विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले. तर सरकार पक्षाच्या वतीने एकूण 7 साक्षीदार तपासले. आरोपीकडून अॅड. जावळे यांनी बचावात्मक युक्तीवाद केला. तसेच गुन्ह्याच्या तपासात त्रुटी असल्याचे युक्तीवादात त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधिश ए. जे. गिऱ्हे यांच्या कोर्टाने पुराव्या अभावी आरोपी संतोष जाधव यांची निर्दोष मुक्तता केली. संतोष जाधव यांच्या वतीने न्यायालयात अॅड. विनोद जावळे, त्यांचे सहकारी अॅड. प्रणिता जावळे, अॅड. राहुल शिंदे, अॅड. विशाल मापटे यांनी कामकाज पाहिले.
One Comment on “विनयभंगाचे आरोपातुन संतोष जाधव यांची निर्दोष मुक्तता – अॅड. जावळे”