मुंबई, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील डी-मार्ट बाहेर आज (दि.03) सकाळी सुमारे साडे नऊ वाजता एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी अचानक गोळीबार करून एका व्यक्तीला जखमी केले. त्यावेळी त्यांनी या आरोपींनी जवळपास पाच ते सहा राऊंड गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
https://x.com/ANI/status/1875070536050679870?t=BnuZwGvUS4187TV6q9rlYw&s=19
पोलिसांकडून तपास सुरू
ही घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन दुचाकीस्वार होते, ज्यांनी अचानक गोळीबार करून पीडित व्यक्तीला जखमी केले आणि नंतर ते तिथून पळून गेले.
पोलिसांनी सध्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. तसेच घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम केले जात आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी विविध पथके तपास करत आहेत. त्यामुळे हे आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी या आरोपींचा शोध वेगाने घेण्याचा निर्धार केला आहे. तसेच या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरीकांमध्ये घबराट
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, डी-मार्टसारख्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.