आरपीआय(आ) च्या बारामती तालुकाध्यक्ष पदी संजय वाघमारे

बारामती, 28 सप्टेंबरः बारामती येथील जलसंपदा विभागच्या विश्रामगृहात 27 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठक आरपीआय (आ) चे पुणे जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संजय वाघमारे यांची आरपीआय (आ) च्या बारामती तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.

बारामतीत माळावरची देवीचे सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन; मात्र..

बारामती तालुक्यासह शहरात एक महिन्यात सक्रिय सभासद नोंदणीची मोहीम पूर्ण करण्याची सूचना जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीत दिली.

या बैठकीस प्रमुख उपस्थिती जिल्हा महिला अध्यक्ष रत्नप्रभा साबळे, जिल्हा सचिव सुनिल शिंदे, जिल्हा युवा कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, माजी तालुकाध्यक्ष मधुकर मोरे, महिला अध्यक्ष पूनम घाडगे, विजय सोनवणे, माऊली कांबळे, सीमा चोपडे, निहल भोसले, विश्वास भोसले, विक्रांत आढाव, निलेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *