बारामतीमधील हुतात्मा स्तंभाला अभिवादन

बारामती, 31 जानेवारीः हुतात्मा दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी बारामती शहरातील नागरिकांनी सोमवारी 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.59 ते 11.03 वाजेपर्यंत सायरन देऊन 2 मिनिटे स्तपतदा पळून अभिवादनेचा कार्यक्रम संपन्न झाला. हुतात्मा दिन हा दरवर्षी संपूर्ण देशात भारत सरकारतर्फे पाळला जातो. तसेच बारामतीमध्ये सुद्धा बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, हुतात्मा दिन पळाला जातो.

विधी संघर्षग्रस्त बालिकेकडून घरफोडी उघड

तसेच स्वातंत्र्य सैनिक पत्नी लीलावती तावरे, सुशीला गुरव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बारामती नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष जय पाटील, काँग्रेस आय शहराध्यक्ष अशोकराव इंगुले, माजी नगराध्यक्षा संध्याताई बोबडे, अनिता गायकवाड, पार्थ गालिंदे, सिद्धेश्वर गवळी, पत्रकार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

तसेच या कार्यक्रमास बारामतीतील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, व्यापारी, संस्थेचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक, शिक्षक, पदाधिकारी, सरकारी-निमसरकारी अधिकारी, आजी-माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हुतात्मा स्तंभास अभिवादन केले.

सातव- गुजर यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादीत बंडाळी; होळकरांची शिष्टाई

सादर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे कार्यकर्ते व कुटुंबीय मोहनराव रणदिवे, दिलीपराव तांबे, यतीन कोठारी, वकील इंकलाब शेख, जगताप शामराव, शेखर कोठारी, विश्वास नागवडे, श्रीराम देशमुख, साहिल कोठारी, राजेंद्र गुरव, कुणाल गालिंदे, पावन घोरपडे, नाभिराज कोठारी, कबीरभाई तांबोळी, अक्षय मुळीक, अल्ताफ अत्तार, तसेच नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, तहसील व प्रांत कार्यालय कर्मचारी, पोलीस दल आदींचे अनमोल सहकार्य लाभल्याची माहिती बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष निलेश कोठारी यांनी दिली.

One Comment on “बारामतीमधील हुतात्मा स्तंभाला अभिवादन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *