दिल्ली, 25 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 15 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. या निर्णयाचा लाभ पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर गेल्या काही काळापासून हे कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करीत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी; कराड दौरा रद्द
वित्त मंत्रालयाच्या या निर्णयानुसार, 6 व्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मूळ वेतनातील महागाई भत्ता 212 टक्क्यांवरून 230 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 40 हजार रुपये आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पेन्शन देखील वाढणार आहे.
याशिवाय पाचव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन श्रेणीनुसार वाढ करण्यात आली आहे. त्यानूसार, पहिल्या श्रेणीत ज्या कर्मचाऱ्यांनी 50 टक्के डीए विलीनीकरणाचा लाभ घेतलेला नाही. त्यांचा महागाई भत्ता 462 टक्क्यांवरून 477 टक्के करण्यात आला आहे. तर दुसऱ्या श्रेणीत 50 टक्के डीए विलीनीकरणाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 412 टक्क्यांवरून 427 टक्के करण्यात आला आहे.
राजकीय डेंग्यू माझ्या स्वभावात आणि रक्तामध्ये नाही – अजित पवार
तर केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सातव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला होता. तर ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिली होती.
One Comment on “केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय”