संत सोपान काका महाराज पालखीचे कोऱ्हाळे गावात भक्तीमय वातावरणात स्वागत

बारामती, 20 जूनः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) श्री संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांच्या पालखीचे काल, सोमवारी 19 जून 2023 रोजी बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या गावी मोठ्या भक्तीमय वातावरणात आगमन झाले. कोऱ्हाळे बु. गावातील सिद्धेश्वराच्या भेटीला सोपान काकांची पालखी सालाबदाप्रमाणे जात असते.

एक हात मदतीचा…

दरवर्षी श्री संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांची पालखी सासवड ते पंढरपूर या मार्गी जात असते. या पालखी मार्गात बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु. गावात एक मुक्काम असतो. या मुक्कामाच्या ठिकाणी जाताना वैष्णव भक्त खूप आनंदात आणि भक्तीमय स्वरूपामध्ये हरिनामाचा गजर करत कोऱ्हाळे बु. गावामध्ये दाखल झाले. यावेळी गावातील ग्रामस्थ व सर्व पदाधिकारी यांनी पालखीचे स्वागत केले. याप्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच यासह ग्रामसदस्यांनी पालखीचे स्वागत केले.

अजित पवार आणि बारामती नगरपरिषदेकडून विद्रुपीकरण कारवाईत दुजाभाव!

One Comment on “संत सोपान काका महाराज पालखीचे कोऱ्हाळे गावात भक्तीमय वातावरणात स्वागत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *