बारामतीत संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

बारामती, 8 फेब्रुवारीः बारामती शहरातील काशिविश्वेवेश्वर मंदिरात संत रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. ही जयंती शामराव दिनकर आगवणे प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली होती.

विविध मागण्यासाठी प्रबुद्ध युवक संघटनेकडून आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन

प्रथमता काशिविश्ववेश्वर मंदिरात संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस युवकाध्यक्ष सन्नी रेडे, सर्वधर्म समभाव समिती अध्यक्ष प्रतिक जोजारे सराफ, जीवन शिंदे सर, बारामती तालुका शिक्षक को ऑफरेटिव्ह सोसायटी चेअरमन हितेश जाधव, सिव्हिल इंजिनिअर दत्तात्रय डमरे, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष आगवणे आदींच्या हस्ते करण्यात आले.

तहसिल कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

या नंतर कसबा भागातील अंगणवाड्यामध्ये जाऊन बाल चमू विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस मीरा जाधव, उमा साळुंके, सारिका कांबळे, रीना झेंडे, सुलभा आगवणे, रेवडे बाई, तसेच राजश्री डमरे, करिश्मा देशमुख, रासकर मॅडम, सृष्टी आगवणे, विकास सोनवणे, गणेश माने, महेश खरात, धीरज ढवाण पाटील, अशोक दुधाळ, अजित विरकर, सिध्दनाथ आगवणे आदी उपस्थित होते.

2 Comments on “बारामतीत संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *