मुंबई, 16 जानेवारी: (विश्वजित खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून, अभिनेत्याला तात्काळ मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. निराज उत्तमानी यांनी माहिती दिली आहे. सैफ अली खान आता धोक्याबाहेर आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
https://x.com/ANI/status/1879752993337450885?t=OoRYFTAdbUN_BbhKr9-stA&s=19
डॉक्टर काय म्हणाले?
अभिनेता सैफ अली खानवर आज (दि.16) पहाटेच्या सुमारास मुंबईतील त्याच्या घरी अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्याच्यावर चाकू सारख्या धारधार शस्त्राने सहा जखमा झाल्या आहेत. त्यातील दोन जखमा खोल असून, यामध्ये अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यालाही दुखापत झाली आहे. सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेतील डॉक्टरांच्या पथकात सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. नितीन डंगे, सल्लागार प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन, सल्लागार अनेस्थेशियोलॉजिस्ट डॉ. निशा गांधी, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कविता श्रीनिवास आणि सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. मनोज देशमुख यांचा समावेश होता. ते सर्व एकत्रितपणे सैफ अली खान यांच्या उपचारासाठी कार्यरत आहेत.
https://x.com/ANI/status/1879781734465851901?t=-ZICe5BUG3w_HCPJ5nvD_w&s=19
सैफच्या टीमकडून निवेदन जारी
दरम्यान, अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत, त्याच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, “सैफ अली खान शस्त्रक्रियेतून बाहेर आला आहे आणि तो धोक्याबाहेर आहे. तो सध्या बरा आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.” तर ऑपरेशन दरम्यान सैफच्या शरीरातून एक 3 इंच धारदार वस्तू काढण्यात असल्याचे म्हटले जात आहे. ही वस्तू चाकूचा भाग असू शकतो, असे सांगितले जात आहे. परंतु, यासंदर्भात अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही.