सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू

सैफ अली खान हल्ला आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या एका हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. या हल्लेखोराने सैफच्या शरीरावर धारधार शस्त्राने सहा वेळा वार केले. यानंतर तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. या हल्लेखोराचा सध्या मुंबई पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 20 पथके तयार केली आहेत. सर्व पथकांना वेगवेगळी कामे सोपवण्यात आली आहेत. तर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तर हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने त्याच्या घरात घुसल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

https://x.com/ANI/status/1879909702068502726?t=4y7-fYUJhPoF3j0bz7EijA&s=19

https://x.com/ANI/status/1879861779427393585?t=3LF3kdUcygb0af_heHAK8w&s=19

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद!

यादरम्यान, हल्ला करणारा हा व्यक्ती सैफच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये तो पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसत आहे. या फोटोच्या आधारे मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हल्लेखोराचे ठिकाणही शोधून काढले आहे. त्यामुळे लवकरच हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशी घडली घटना 

दरम्यान, हा अज्ञात हल्लेखोर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सैफ अली खानच्या मुंबईतील घरात शिरला होता. या हल्लेखोराला पाहताच घरातील मोलकरणीने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सैफ तात्काळ तेथे पोहोचला आणि त्याची हल्लेखोराशी झटापट झाली. त्यादरम्यान हल्लेखोराने सैफवर चाकूने अनेक वार केले. यामध्ये तो जखमी झाला. हल्लेखोराने सैफवर सहा वेळा धारधार शस्त्राने वार केले.

प्रकृती धोक्याबाहेर

यानंतर सैफला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, “सैफ अली खान वर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो आता धोक्याबाहेर आहेत. सध्या तो बरा होत असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व कुटुंबीय सुरक्षित आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *