दुखःद! मराठा समाजाचा दिग्गज नेता हरपला

पुणे, 14 ऑगस्टः महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज पहाटे 5 च्या सुमारास घडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे हे गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले आहे.

बारामतीत देशभक्तीपर गाण्यावर पोलिसांचा डान्स

दरम्यान, विनायक मेटे हे आज, 14 ऑगस्ट 2022 रोजी बैठकीसाठी पहाटे 5 च्या सुमारास मुंबईला येत होते. त्यावेळेस मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज दुपारी मुख्यमंत्र्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी बीडहून मुंबईला येत होते.

अपघातानंतर विनायक मेटे यांना तब्बल एक तासानंतर अपातकालीन मदत मिळाल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *