बारामती, 3 जुलैः बारामती शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याकरिता केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारामती नगरपरिषद समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा मार्फत येत्या 9 ऑगस्ट 2022 रोजी (क्रांती दिनी) पासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र 29 जुलै 2022 रोजी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले.
हॉटेलला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड; कारवाईची मागणी
सदर निवेदनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथील व्यायाम शाळेमध्ये मॅट आणि आरसे बसवून व्यायाम साहित्यांची फिटिंग करून सदरील व्यायाम शाळा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी, तसेच याठिकाणी ओपन जिम देखील सुरु करण्यात यावी. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर टेनिस बॉलवर सराव करण्यास आणि क्रिकेट सामने खेळविण्यास परवानगी देण्यात यावी. रिपाई (आठवले) पक्षाच्या आंदोलनाची दखल घेत आमराई येथील दादासोनगर, वडकेनगर आणि प्रबुद्धनगर आदी भागांतील नागरिकांसाठी जे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते, त्या संबंधित शौचालय बांधून 3 ते 4 वर्ष झाले तरी लाईटची जोडणी केली गेली नाही. तरी त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात यावी, सोबतच या भागामध्ये आणि आमराई मधील अंतर्गत रस्त्यांवर देखील लाईटचे पोल बसविण्यात यावेत, तसेच सृष्टी कॉम्प्लेक्स पाठीमागील नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेकरिता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
‘पोस्टकार्ड आपले घरी’ द्वारे 799 अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना आवाहन
यावेळी पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू )सोनवणे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, मोईन बागवान यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.